चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स

आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

Updated: Aug 24, 2015, 11:35 PM IST
चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स  title=

मुंबई: आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

भारतीय शेअर बाजाराला गेल्या आठवड्यापासून भरलेल्या चिनी तापानं नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपले रंग दाखवायला सुरूवात केली. दिवसअखेर सेनेक्स 1624.51 अंशांनी तर निफ्टी 490.95 अंशांनी गडगडला. 

बाजार गडगडण्याचे कारण -
- चीनचं चलन असणाऱ्या युआनचं झालेलं अवमूल्यन हे बाजार गडगडण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे. जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनच्या बाजारातील घसरणीचा जगातल्या इतर अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला. भारतीय शेअऱ बाजाराच्या इतिहासातली ही तिसरी मोठी घसरण ठरली. 
- एकाच वेळी क्रूड ऑईल आणि रुपया दोन्हींच्या किंमती घसरताय. त्यामुळं घसरणाऱ्या क्रूड ऑईलचा फायदा घेणं भारताला कठीण जातंय. 

घसरणाऱ्या बाजारातही योग्य ती संधी साधण्यासाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिलेत
- ज्यांनी बाजारात आधीच गुंतवणूक केलीय त्यांनी
पॅनिक सेलिंगचा मार्ग अवलंबू नये. 
- जे गुंतवणूकदार एसआयपीच्या मार्गानं गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. 
- ज्या कंपन्यांची उत्पादनं तुम्ही नेहमी वापरता, त्या कंपन्यांचे शेअर्स घ्या. 
- ज्या कंपन्यांची उत्पादनं तुम्हाला माहित नाहीत, अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू नका. 
- पेनी स्टॉक्स किंवा फोन, व्हॉट्स अॅपवर आलेल्या टीप्सवर गुंतवणूक किंवा विक्री करू नका. 
- गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.