भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले!

 शिवसेनेचा आता महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभासे आणि मनसेला आलेले महत्व कमी झालेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2017, 12:26 AM IST
भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले! title=

मुंबई : पालिका महापौर निवडणुकीआधीच भाजपने अनपेक्षित खेळी करत निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सत्तेत बसण्यासाठीचे महत्व कमी झाले. शिवसेनेचा आता महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभासे आणि मनसेला आलेले महत्व कमी झालेय.

मुंबईत महापौर आपलाच बसणार असा छातीठोक दावा भाजप आणि शिवसेने केला होता. मात्र, शेवटपर्यंत शिवसेना आणि भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे चुरस निर्माण झाली होती. काँग्रेसने सर्वात आधी उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजप, शिवसेना यांच्याबरोबर काँग्रेसचा उमेवार असणार हे निश्चित मानन्यात येत होते. आज शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार अर्ज दाखल केले.

मात्र, भाजपने कोणतीही घोषणा न करता पत्रकार परिषद घेतली आणि या निवडणुकीतील हवाच काढून घेतली. भाजप कोणतीही निवडणूक लढणार नाही. तसेच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही. मात्र, शिवसेनेला देवू असे सांगत गुगली टाकली. त्यामुळे महापौर शर्यतीत आलेली रंगत संपल्यात जमा झाली आहे.

भाजपने आपला उमेदवार दिला असता तर अखिल भारतीय सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिक महत्व आले असते. त्यापूर्वीच अपक्ष नगरसवेकांना शिवसेनेने गळाला लावले होते. तर भाजपने अभासेच्या गीता गवळी यांना आपल्याकडे वळविले. त्यामुळे मनसेचे महत्व अधिक वाढले. त्यातच मनसेने आपल्याला गृहीत धरु नका, आम्ही मराठी उमेदवार या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला अधिक महत्व आले होते. त्यामुळे महापौर निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता सायंकाळी 4 वाजेपर्यंत कायम होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीतील हवाच काढून टाकली. त्यामुळे मनसेचेही महत्व कमी झाले. तर गीता गवळी यांचे 'ना घर का ना घाटका', अशी अवस्था झाली आहे.