www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांच्या सेवेत बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे उद्यापासून धावणार आहे. 10 रुपयामध्ये कुल प्रवास करता येणार आहेत. महिनाभरासाठी केवळ 10 रुपये तिकीट दर आकारण्याच्या निर्णय रिलायन्सने घेतला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु होत आहे.
मेट्रोच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या टप्प्याचे उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबतशनिवारी अधिकृत घोषणा केली. मेट्रोच्या तिकीटाचे दर किती असतील हे अद्याप स्पष्ट झाले नसून महिनाभरासाठी केवळ 10 रुपये असणार आहेत. कोठूनही कुठेही 10 रुपयात प्रवास करता येणार आहे.
रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून `मेट्रो` मुंबईकरांसाठी सुरू करण्यात येणार असून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ती धावणार आहे. 4 एसी डबे असलेल्या मेट्रोचा वेग प्रतितास 80 किमी इतका असून एका वेळेस मेट्रोतून 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. एका डब्यात 50 प्रवासी असतील.
सकाळी 5.30 ते रात्री 15 वाजेपर्यंत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत असेल. मेट्रोमुळे वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी फक्त 21 मिनिटांचा कालावधी लागणार आहेत. दर चार मिनिटांनी एक मेट्रो धावणार असून प्रत्येक स्टेशनवर मेट्रो 30 सेकंदांसाठी थांबेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.