www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दाऊदी बोहरी समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बु-हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील मलबार हिल येथील सैफी महाल या त्यांच्या निवासस्थानाजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडली. दरम्यान, त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईसह जगभरातून लाखोंचा जनसागर लोटला आहे.
सय्यदना यांच्या अंत्ययात्रेला दुपारी सुरुवात झालीय. दुपारी भेंडी बाजारमधील सैफी मशिदीजवळ त्यांचा दफनविधी कऱण्यात येणार आहे. यावेळी मलबार हिल, भेंडी बाजार, सरदार वल्लभभाई पटेल मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. डॉक्टर सैय्यदना यांचे लाखो भाविक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातून आले आहेत.
दाऊदी बोहरा समाजाचे ते ५२वे धर्मगुरू असलेल्या सैय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील बोहरा समाजाचे लोक मुंबईत पोहचले असून कालपासून गर्दीचा ओघ वाढत होता.
सैफी महाल या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते मध्यरात्रीही गर्दी वाढत होती. अखेर रात्री दोनच्या सुमारास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे सर्वत्र गोंधळ माजून चेंगराचेंगरीत १८ जणांना मृ्त्यू झाल.जखमींना चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉ. सय्यदना यांचे सैफी महल या त्यांच्या रहात्या घरी काल निधन झालं होतं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जण ठार झालेत तर ४० हून अधीक जण जखमी झालेत. जखमींवर चर्नीरोडमधील सैफी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.