अखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे

अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

Updated: Oct 7, 2014, 05:22 PM IST
अखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे title=

मुंबई : अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

मी दिल्लीत असेपर्यंत छत्रपतींच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी ग्वाही धुळ्यातील दोंडाईचातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  तर स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजप ठाम असल्याचे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवीस यांनी स्पष्टीकरण दिलेय. त्यामुळे वेगळ्या विदर्भावर भाजपात फाटाफूट झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं नरेंद्र मोदींनी दोंडाईचा इथं ठामपणे सांगितलं असतांनाही वेगळ्या विदर्भाची आमची भूमिका कायम असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलयं. नरेंद्र मोदींचा इशारा हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याबाबत  होता असा दावाही फडणवीस यांनी केलाय. छोटया राज्यांची भाजपची भूमिका कायम आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील जनतेनं नेमका कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल निर्माण झालाय.

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोंडाईचामध्ये ग्वाही दिली होती. मात्र, राज्यातील भाजप नेते वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मतदारांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा सवाल उपस्थित होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, असा फिल अजुनही येत नाही. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, असे वाटतात, असे राज म्हणालेत. तर विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे आज पुढे आले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.