मेघा कुचिक, मुंबई : कारण कोणतही असो आपण सारेचजण वाट पाहत असतो ती पार्टीची. अगदी आयत्या क्षणीही तुम्हाला झटपट पार्टीचं आयोजन करायचं असेल, तर बार मोबाईल तुमच्यासाठी पार्टीचं झटपट आयोजन करु शकते. कुठेही आणि केव्हाही तुम्हाला पार्टीचं आयोजन करायचं असेल तर बार मोबाईलला ऑर्डर द्या आणि पार्टीला सुरुवात करा.
ही संकल्पना घेऊन आलेत ते गौरीष रांगणेकर हे मराठी उद्योजक. बार मोबाईल हा ब्रँड खऱ्या अर्थानं भारतात प्रस्थापित केला ते गौरीष रांगणेकर तुमच्या घरी येऊनही पार्टीचं आयोजन करुन देतात. त्यांची टीम केवळ काही मिनिटांमध्ये बारचा सेट अप उभा करतात आणि मग तुम्ही पार्टी करायला मोकळे.
विशेष म्हणजे आता दिवाळीतही घरोघरी पार्टीचं आयोजन केलं जातं. यासाठीही अगदी पारंपरिक पद्धतीनं बार सेट उभारुन पार्टी आयोजित करुन देण्याचं काम गौरीष रांगणेकर करतात.
न्यूयॉर्क आणि लंडन इंथ मिक्सॉलॉजी कोर्स करुन भारतात परतलेले गौरीष, सध्या भारतात बार सेट उभं करण्याचं काम करताहेत. वांद्र्यातल्या विसिनिया केम्प कॉर्नरचे ते मालक आहेत. तर अंधेरीमधल्या टोस्ट बिस्ट्रो अँड रुफटॉप बार गौरीष आपल्या भागीदारासोबत चालवतात.
मुंबईत रेस्टॉरंट उभं करण्यातही त्यांचा सल्ला अनेकजण घेतात. एवढ्या लहान वयातली त्यांची ही भरारी नक्कीच कौतुकास्पद आहे आणि तुम्हालाही केव्हाही आणि कुठेही झटपट पार्टीचं आयोजन करायचं असेल, तर मग एक कॉल करा बार मोबाईलला आणि सुरु करा पॉर्टी ऑल नाईट.