मुंबई : दादरमधील एका बड्या शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. शिवाजी पार्क पोलिसांनी एकाला बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात अटक केली.
अधिक वाचा : बापाने लावला मुलीच्या नात्याला कलंक, १० वर्षे केला रेप
बलात्कार केल्याप्रकरणी सोमनाथ यादव (२०) याला पोलिसांनी अटक केली. तो कॅन्टीन कर्मचारी आहे. शाळेत समारंभ सुरू असताना पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला सोमनाथने बाजूला नेऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. प्रचंड घाबरलेली अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेच्या प्रसाधनगृहात जावून लपली होती.
मुलगी घरी न आल्याने नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. यावेळी कोणीतरी आल्याची चाहूल लागताच ती प्रसाधनगृहातून धावतच बाहेर आली. पालक आणि शिक्षकांनी चौकशी केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ यादव याला अटक केली.