मुंबई : महिला आणि बालविकास खात्यातर्फे आंगणवाड्यातील बालकांसाठी खरेदी करण्यात आलेली चिक्की नित्कृष्ट दर्जाची असल्याचे खुद्द या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केले आहे.
शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी चिक्कीचा दर्जा नित्कृष्ट असल्याचे मान्य केले आहे.
ज्या पुरवठा कंपनीने गेली काही वर्ष निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा आणि खिचडीचा पुरवठा केला त्याच कंपनीला पुन्हा कंत्राट देण्यात आले आहे का ? या प्रश्नाला हे अंशतः खरे आहे असे लेखी उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
मात्र याप्रकरणात करावाई करणार का या लेखी प्रश्नाला प्रश्न उद्भवत नाही असं लेखी उत्तर देऊन कारवाई करण्याचे टाळण्यात आले आहे.
एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी चिक्कीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात असताना, स्वतः मंत्री पंकजा मुंडेंनेही ते मान्य केले आहे. मग याप्रकरणी कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.