मुंबई : मुंबई सध्या Kiss पोस्टरची चर्चा सुरु आहे. वांद्रे परिसरात ठिकठिकाणी 'किस घेतले पोस्टर्स' लक्ष वेधून घेत आहेत. ही कोणी लावलीत आणि का लावलीत, याची चर्चा झडत आहे. दरम्यान, काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
किस करताना या पोस्टर्सवर दाम्पत्य दिसत आहेत. ही पोस्टर्स कोणी लावलीत, याचीच चर्चा आहेत. या पोस्टर्समुळे परिसरातून चीड व्यक्त होत आहे. झिगझॅग रोड, टर्नर रोड, पाली हिल, पाली मार्केट या ठिकाणी ही Kiss पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
दरम्यान ही पोस्टर्स अश्लिल असून, ही आपली संस्कृती नाही, असे येथील काही नागरिकांनी म्हटले आहे. या पोस्टर्समुळे शाळा- कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे हे पोस्टर्स त्वरित हटवावेत, अशी मागणी करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करावी, असे अनेकांनी म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.