www.24taas.com,मुंबई
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे महाराष्ट्रात एक चाक निखळून पडते आहे की काय, याची चिंता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त करताना पोलीस आणि आमदारांमध्ये सुरु असलेल्या वादावर टीप्पणी केलीय. यावेळी शरद पवारांनी दोघांनाही खडे बोल सुनावले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सांगता समारंभात लोकप्रतिनिधींना कानपिचक्यास देताना ते म्हणाले, मान, अधिकार मागून मिळत नसतात. ते मिळतील, अशी कृती असावी लागते. जनतेच्या यातना कमी करण्यासाठी अधिकारांचा वापर करायचा असतो, याचे भान ठेवायला हवे. सत्तेचा स्वीकार विनम्रपणे व्हावा, अशी यशवंतरावांची शिकवण होती. ती प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे.
पवार यांनी पोलीस आणि आमदारांमध्ये सुरु असलेल्या वादावर टीप्पणी केलीय. यावेळी पवारांनी दोघांनाही खडे बोल सुनावले. लोकप्रतिनीधी आणि प्रशासन हे गाडीचे दोन चाक असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलंय. तसेच सन्मान मागून मिळत नसतो तर तो कामातून मिळवावा लागत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलंय. तसेच लोकप्रतिनिधींनी यशवंतरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय.
माजी सनदी अधिकारी माजी राज्यपाल राम प्रधान यांनी यशवंतरावांवर लिहिलेल्या पुस्तकाचे, तसेच टपाल खात्याने तयार केलेल्या विशेष लिफाफ्याचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. प्रदीप भिडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.