मुंबई जलमय, वाहतुकीची कोंडी

मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 24, 2013, 04:58 PM IST

www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.
मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. बुधवारी सकाळी करीरोड, भायकळा, हिंदमाता, एलफिन्ट्बुधन, परळ, दादर, सांताक्रूझ, मालाड या भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ता वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर काही ठिकाणी ट्राफिक जॅमचा सामना करावा लागत आहे.

पावसामुळे उपनगरीय रेल्वे उशीराने धावत आहेत. मुंबईत पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या २० ते ३० मिनिटे उशीराने धावत आहेत. तर मध्य आणि हार्बरची वाहतूक सुरळीत सुरू आहे. पावसामुळे रेल्वेला गर्दी नसल्याने प्रवास सुखकर होत आहे. पावसाचा व्यत्यय काहीप्रमाणात येत असला तरी प्रवास सुरळीत होत आहे.
पावसामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने पूर्व आणि पश्चिम द्रृतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. तर ठाण्यात मुंब्रा बायपास मार्ग खचल्याने ऐरोली, कळवा, शिळ फाटा मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. जड वाहनांची वाहतूक ऐरोलीमार्गे अहमदाबाद महामार्गाकडे वळवण्यात आली आहे. ठाण्यात तीन हात नाका परिसरात वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. ठाण्यात आनंदनगर जकात नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, पावसामुळे समुद्र खवलेला असल्याने कोणीही समुद्रात जाऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. बुधवारी वर्षभरातली सर्वात मोठी भरती आहे. समुद्रात दुपारी एक वाजून २७ मिनिटांनी ४.९४ मीटर उंच लाट उसळणार आहे. यामुळे समुद्राजवळ न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाऊस खूप पडत असल्याने गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटोफीचर पावसाने उडविली दैना

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.