मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पाऊस

पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झालीय. 

Updated: Aug 4, 2014, 11:47 AM IST
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पाऊस title=

मुंबई : पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झालीय. 

ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातही पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तलावांच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. 

पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. वाहतूक सुरळीत आहे. आज सकाळीही पावसाची रिप रिप काही ठिकाणी सुरूच होती. मुंबईच्या पश्चिम उपनगरांतही पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.