काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

Updated: Feb 21, 2017, 12:42 PM IST
काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे title=

मुंबई : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. शिवाजी पार्कमधील बालमोहन विद्यामंदिर शाळेत त्यांनी मतदान केले.  

प्रचारात राजकीय पक्षांनी ज्या प्रमाणावर पैसा उधळण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो, असे वाटू लागल्याची खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त. सत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वापराचा हाच धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालवला आहे, अशी टीका त्यांनी केली.