शिवसेना-भाजपमध्ये चर्चा झाली, सहभागाचा निर्णय अमित शहा चर्चेनंतर

शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी आजपासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत आलेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेत्यांनीशी केली. या चर्चेची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कळविली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.

Updated: Nov 28, 2014, 08:04 PM IST
शिवसेना-भाजपमध्ये चर्चा झाली, सहभागाचा निर्णय अमित शहा चर्चेनंतर

मुंबई : शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी आजपासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत आलेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेत्यांनीशी केली. या चर्चेची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कळविली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.

शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावी, यासाठी ही चर्चा झाली. शिवसेनेला सहा कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री हवेत, तसा प्रस्ताव भाजपपुढे शिवसेनेने ठेवला. या प्रस्ताच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक झाली. संध्याकाळी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेले. दोन्ही पक्षांमध्ये प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या चर्चेत जातीनं लक्ष घातल्याच सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदाबाबत शिवसेना आग्रही असून, भाजप ही दोन्ही पदे शिवसेनेला देण्यास अनुत्सुक आहे. त्यामुळे आता तरी हा तिढा सुटणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान, आजच्या चर्चेची माहिती भाजपनेते अमित शहा यांना देणार आहे. तसेच शिवसेनेचा प्रस्तावरही त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर पुढील बोलणी पूर्ण होतील. अन्यथा पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरु राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.