पठाणकोट हल्ला नरेंद्र मोदींच्या पाक दौऱ्याची भेट : संजय राऊत

पठाणकोट अतिरेकी हल्ला हा मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची भेट असल्याची बोचरी टीका, संजय राऊत यांनी केलेय.

Updated: Jan 2, 2016, 03:58 PM IST
पठाणकोट हल्ला नरेंद्र मोदींच्या पाक दौऱ्याची भेट : संजय राऊत   title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा शिवसेनेने टार्गेट केलेय. पठाणकोट अतिरेकी हल्ला हा मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची भेट असल्याची बोचरी टीका, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेय.

भारतीय लष्कराच्या तळावर अतिरेकी हल्ला म्हणजे घृणास्पद आणि निंदनीय आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद पोसला जात आहे. भारत नेहमी शांतता बोलणीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, पाककडून भ्याड हल्ले करण्यात येत आहे. पाकिस्तान जोपर्यंत असे हल्ले थांबवित नाही, तोपर्यंत बोलणी करण्यास शिवसेनेचा विरोध आहे, असे राऊत म्हणालेत.

ज्याची भीती होती तेच घडलयं, एका बाजुला आमचं सरकार पाकिस्तानशी शांततेच्या गोष्टी करतेय आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. पठाणकोट हल्ला म्हणजे नरेंद्र मोदींना पाकिस्तान दौऱ्याची अतिरेक्यांकडून देण्यात आलेली भेट असल्याचे राऊत म्हणालेत.

नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचा विवाह, हे निमित्त साधत मोदी यांनी पाकिस्तानला ही अवचित भेट दिली होती. त्यानंतर विरोधकांनी मोदींच्या पाकिस्तान भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे.