शिवसेनेशी जमले नाही तर कोणाशीही युती करा अणि सत्ता आणा : भाजप

शिवसेनेशी नाही जमले तर कोणाशीही युती करा पण आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपने दिले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 16, 2017, 11:17 AM IST
शिवसेनेशी जमले नाही तर कोणाशीही युती करा अणि सत्ता आणा : भाजप title=

मुंबई : शिवसेनेशी नाही जमले तर कोणाशीही युती करा पण आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपने दिले आहेत. भाजप कोर कमिटीची बैठकित हा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेनं साथ दिली तर ठीक नाही तर स्थानीक पातळीवर जे साथ देतील त्यांना घेऊन अध्यक्ष बनवण्याचा निर्णय भाजप कोर कमिटी बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. जास्तीत जास्त जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडून आणण्यासाठी भाजप आक्रमक झालीय. 

प्रत्येक जिल्हा पक्षनिहाय स्थिति वेगळी असल्याने युती - आघाडी करण्याचे अधिकार कोर कमिटीने जिल्हा पातळीवर दिले आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पण स्थानीय पातळीवर अभद्र युती - आघाड्या होण्याची यामुळे शक्यता निर्माण झालीय.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपची जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकासाठी कोर कमिटीची मॅरेथॉन आढावा बैठक बुधवारी रात्री झाली.