मुंबई : केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.
भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला सत्तेत शामील करून घेतलं होतं. शिवसेनेला राज्यात ५ कॅबिनेट तर ७ राज्यमंत्रिपदं मिळाली होती. केंद्रात आता सेनेला कोणतं मंत्रीपद मिळतं हे पाहावं लागेल.