तिसरी बैठकही निष्फळ, सेनेचा भाजपपुढे 60 जागांचा प्रस्ताव

मुंबई महानगरपालिका जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे.

Updated: Jan 21, 2017, 07:56 PM IST
तिसरी बैठकही निष्फळ, सेनेचा भाजपपुढे 60 जागांचा प्रस्ताव  title=

मुंबई :  मुंबई महानगरपालिका जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. संध्याकाळी मुंबईत आयोजित या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन नेते उपस्थित होते. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरच ही बैठक अडखळली.

भाजपनं निम्म्या म्हणजे 114 जागांची मागणी शिवसेनेसमोर ठेवली, पण शिवसेनेनं भाजप पुढ्यात 60 जागांचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही पक्ष आपल्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळे ही चर्चा पुढे सरकूच शकली नाही. अखेर जागावाटपाचा हा तिढा वरिष्ठ पातळीवरच सोडवला जाईल या मुद्द्यावर दोन्ही गटांचं एकमत झालं. आणि ही बैठक तिथेच संपली.