एसटी प्रवास महागला!

आषाढी वारी तोंडावर असतानाच एसटी प्रवास महागलाय. डिझेल दरवाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती, तसंच महागाई भत्त्यात झालेली वाढ या कारणांमुळे एसटीने भाडेवाढ जाहीर केलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 29, 2013, 08:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आषाढी वारी तोंडावर असतानाच एसटी प्रवास महागलाय. डिझेल दरवाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती, तसंच महागाई भत्त्यात झालेली वाढ या कारणांमुळे एसटीने भाडेवाढ जाहीर केलीय. २ जुलैपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. ६.४८ टक्के इतकी भाडेवाढ झालीय. साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या २४ किलोमीटरच्या टप्प्यासाठी १ रूपया तर २५ ते ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी २ रूपये अशी भाडेवाढ करण्यात आलीय.
एसटी महामंडळाने तयार केलेला १२.५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव नाकारून राज्य परिवहन प्राधिकरणाने आज ६.६९ टक्के भाडेवाढीला मंजुरी दिली. त्यामुळे एसटीचे किमान भाडे १ रुपयाने वाढणार आहे. याचा पहिला फटका पंढरपूरला मोठय़ा संख्येने जाणार्याा वारकर्यां ना बसणार आहे.
याबाबत, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य परिवहन प्राधिकरणामध्ये मंत्रालयात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. ही भाडेवाढ ३० जूनच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. एसटी महामंडळाकडून याची माहिती दिली जाईल, असे राज्य परिवहनचे सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी २०१२ मध्ये जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये लागोपाठ भाडेवाढ करण्यात आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.