वर्षभरातच घटकपक्ष फडणवीस सरकारला कंटाळले

अवघ्या वर्षाच्या आत महायुतीतील घटकपक्ष भाजपला कंटाळलेत. त्यांनी भाजपला सोडण्याची भाषा सुरु केलीय. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमधल्या बैठकीतून घटकपक्षाच्या नेत्यांनी हा इशारा दिलाय.

Updated: May 9, 2015, 06:35 PM IST
वर्षभरातच घटकपक्ष फडणवीस सरकारला कंटाळले title=

मुंबई : अवघ्या वर्षाच्या आत महायुतीतील घटकपक्ष भाजपला कंटाळलेत. त्यांनी भाजपला सोडण्याची भाषा सुरु केलीय. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमधल्या बैठकीतून घटकपक्षाच्या नेत्यांनी हा इशारा दिलाय.

आज, मुंबईत महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करत होते आणि गेटवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप सरकारचा उद्धार व्यक्त होत होता. केंद्रातील भाजपप्रणित सत्तेला वर्षं आणि राज्यातलं सरकार सहावा महिना पूर्ण करतंय. मात्र महायुतीतले घटकपक्ष समाधानी नाहीत.

भाजपकडून आपली फसवणूक झाल्याची भावना घटकपक्षांमध्ये वाढीला लागलीय. त्यातूनच भाजपवर चौफर हल्ला सुरु झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही खंत बोलूनही दाखवली. 

भाजपसोबत वाटाघाटीतून मंत्रिपद मिळावं, यासाठी महादेव जानकर आणि विनायक मेटे जोरदार प्रयत्न करत आहेत. 

महायुतीतल्या घटकपक्षांना सध्या फारसं काम नाही. त्यातूनच या असमाधानी नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केल्यानं, शिवसेनेला मात्र गुदगुल्या होताहेत... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.