मुंबई : माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर पडलीय. धस यांच्या मालकीच्या असणाऱ्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय.
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील परंदवडी देवस्थानच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी धस यांच्याकडे सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा निकाल धस यांनी व्यावसायिकाच्या बाजूने दिला होता.
मात्र, याबाबतचा लेखी आदेश काढण्यासाठी महसूल विभागाचे कक्ष अधिकारी संजय सुराडकर, एजंट म्हणून काम करणारा वैभव आंधळे आणि देवीदास दहीफळे यांनी या व्यावसायिकाकडे २५ लाखांची लाच मागितली होती. त्यातील २३ लाख रूपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांनाही रंगेहाथ पकडले होते.
त्यामुळे या प्रकरणात सुरेश धस यांच्यावरही संशयाचे सावट निर्माण झाल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवून धस यांच्या घरावर छापा टाकला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.