मुंबईत व्यापाराची पत्नीसह आत्महत्या

एका लोखंड व्यापाऱ्यानं पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना मुंबईत बोरिवलीमध्ये घडलीये. अशोक आणि इला शाह अशी त्यांची नावं आहेत. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय. 

Updated: May 6, 2016, 11:33 AM IST
मुंबईत व्यापाराची पत्नीसह आत्महत्या title=

मुंबई : एका लोखंड व्यापाऱ्यानं पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना मुंबईत बोरिवलीमध्ये घडलीये. अशोक आणि इला शाह अशी त्यांची नावं आहेत. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय. 

काल संध्याकाळी डॉक्टर असलेला मुलगा मीर याच्याकडे अशोक यांनी चिंता बोलून दाखवली होती. त्यावर काळजी न करण्याचं सांगून मीर हॉस्पिटलमध्ये गेले. रात्री 10वाजता ते परतले तेव्हा फाशी घेतलेल्या अवस्थेतले आई-वडिलांचे मृतदेह त्यांना आढळले. 

अशोक शाह यांची वसईमध्ये स्टील फॅक्टरी आहे. यासाठी त्यांनी बरंच कर्ज घेतलं होतं आणि ते फेडणं त्यांना अशक्य झालं होतं, असं समोर येतंय. आता त्यांनी कुणाकडून आणि नेमकं किती कर्ज घेतलं होतं, ते फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का याचा पोलीस शोध घेतायत.