मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची गुरुवारी ६ एप्रिलला बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळेल तर रामदास कदम हे मंत्रीपदावर कायम राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठीकीवेळी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार त्यांच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या नाराजीची दखल पक्षनेतृत्वाकडून घेतल्याचं बोललं जात आहे.