तर गडकरी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार होते - उद्धव

 नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार राहिले असते पण, अरविंद केजरीवाल यांच्या तकलादू आरोपांमुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं. गडकरी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, तर तेच पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार झाले असते, अशा शब्दात उद्धव यांनी गडकरी यांच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

Updated: Dec 23, 2015, 06:22 PM IST
तर गडकरी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार होते - उद्धव title=

मुंबई :  नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार राहिले असते पण, अरविंद केजरीवाल यांच्या तकलादू आरोपांमुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं. गडकरी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, तर तेच पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार झाले असते, अशा शब्दात उद्धव यांनी गडकरी यांच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आताही अरूण जेटलींवर असेच आरोप केले आहेत. तर गडकरींना हटवण्यामागे घरातलेच होते, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

राजेंद्र कुमार यांच्या चौकशीशी केजरीवाल यांचा थेट संबंध नव्हता. तरीही केजरीवाल यांनी हे सर्व प्रकरण अंगावर ओढवून घेतले, आणि त्याचा संबंध अर्थमंत्री जेटली यांच्याशी जोडून थयथयाट केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.