राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2017, 04:35 PM IST
 राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया  title=

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडली होती. युतीबाबत प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की विचार करेन असे महत्वाचे विधान त्यांनी झी 24 तास शी अनौपचारिक गप्पा दरम्यान केले होते.

याबाबत पत्रकारांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काहीच न बोलणे पसंत केले आणि त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडून जय महाराष्ट्र म्हटले आणि पत्रकार परिषद गुंडाळली. 

समृद्धी मार्गाबाबत...

समृद्धी मार्गादरम्यान  जमिन जाणारे शेतकरी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्री येथे आले होते.  या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

विकास होताना सुपीक जमिन जाऊ नये ही भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मांडणी आखणी करणारे खात्यानी खबरदारी घ्यावी. मेट्रो करतानाही ही काळजी घ्यावी. पीएम यांनी दणादण कार्यक्रम करत उदघाटन केले, पण पुण्यात मेट्रो ला हरीत लवादाने स्टे दिला. यात बदनामी विनाकारण होतो. आखणी करताना खबरदारी घ्यायला हवे. जनतेला विश्वासात घेत विकास व्हावा, असेही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

उद्धव ठाकरे युतीबाबत

उद्या परवा निवडणूक आयोग घोषणा करेल,  युतीबाबत आम्हाला स्पष्ट करावे लागेल. नाही तर निवडणूक होऊन जाईल अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.  सगळे अंतिम उत्तर तुमच्या समोर ठेवेन, असेही त्यांनी म्हटले आहे.