मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड करण्यासाठी राज्यापालांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलीय.
या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी आणि नागपूच्या नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांचा समावेश आहे. ही समिती कुलगुरूपदासाठी एकाच्या नावाची शिफारस करणार आहे.
विद्यमान कुलगुरू राजन वेळूकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या कुलगुरूची निवड करणं बंधनकारक आहे.
कुलगुरुपदासाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आता संपलीय... पाहुयात या पदासाठी कुणा-कुणाची नावं स्पर्धेत आहेत...
डॉ. सुहास पेडणेकर, प्राचार्य रुईया
डॉ. नरेश चंद्रा, प्राचार्य, बीर्ला कॉलेज
डॉ. राजपाल हांडे, संचालक, मुंबई विद्यापीठ
डॉ. प्रल्हाद जोगदंड, डीन, आर्ट्स
विष्णू मगरे, प्राचार्य, किर्ती कॉलेज
डॉ. मधू नायर, डीन कॉमर्स
डॉ. अभय पेठे, एचओडी, इकोनॉमीक्स विभाग
डॉ. किरण मुनगेकर, प्राचार्य खालसा कॉलेज
डॉ. जी व्ही पारगावकर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.