शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

Updated: Oct 19, 2015, 11:46 PM IST
शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक title=

मुंबई: शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधानं आता रस्त्यावरून थेट क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री मारली... क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष शहरयार खान यांच्यात सोमवारी सकाळी बैठक होणार होती. मात्र दक्षिण मुंबईतले शंभराहून अधिक शिवसैनिक सकाळीच वानखेडेवरील बीसीआय कार्यालयात घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनेच्या आंदोलनामुळं ही बैठक रद्द करावी लागली. आता ही बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. याप्रकरणी १० शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आणि नंतर २००० हजारांच्या जामीनावर सुटका केली. 

आणखी वाचा - शिवसैनिकांचा बीसीसीआय कार्यालयात धुडगूस

शिवसैनिकांच्या या आंदोलनाचं शिवसेना नेत्यांनी जोरदार समर्थन केलंय. तर दुसरीकडं राष्ट्रवादी आणि भाजपनं मात्र त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपण शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं म्हटलंय. मुंबईत भारत-पाकिस्तान मॅच झाल्यास संपूर्ण संरक्षण देण्यात येईल, असं ते म्हणाले. 

आधी गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द... नंतर कसुरींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला फासलेली शाई... आणि आता थेट बीसीसीआय ऑफिसात धडक... गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाला एवढी धार येण्याचं कारण काय? भाजपपेक्षा आपण प्रखर राष्ट्रभक्त आहोत, हे दाखवण्याचा हा खटाटोप आहे का? 

आणखी वाचा - बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचा बार उडवून देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याची ही खेळी आहे का? आणि पाकिस्तानवरून आकांडतांडव करणारी शिवसेना महागाईचा आगडोंब उसळला असताना तूरडाळ गिळून गप्प का? असे सवाल देखील केले जातायेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.