सोनिया गांधी आणि अहमद यांच्यापर्यंत अनेकांना पोहचविणारे कृपाशंकर सिंह हे मोठे दलाल असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांचा समोर आलेला घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिली आहे. तसेच त्यांना या प्रकरणात कधी अटक होऊ शकते. या प्रकरणावर पहिल्यांच बोलताना राज ठाकरे यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर आगपाखड केले.
कृपाशंकर यांची संपूर्ण कलिना मध्ये जमिन आहे. हे असे बाहेरून येणारे आमच्या महाराष्ट्रात घोटाळे करतात आणि आपण त्यांना निवडून देतो. यांच्या सारख्यांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण गढूळ झालं आहे. अनेकांना सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहचवणारे कृपा हे दलाल आहेत, ते सगळ्यात मोठे दलाल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
२००९ पासून ह्या गोष्टी सुरू आहेत आणि कारवाई करण्यासाठी तीन वर्ष का लागले आहे. कृपाशंकर यांच्यावर कारवाईला काँग्रेस दिरंगाई का करीत आहे असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. कृपाशंकर आत गेले की, अनेकांचे नंबर लागणार आहेत. त्यामुळे काँग्रसच्या इशाऱ्यावर जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येत आहे. तोंडदेखली कारवाई होत असेल तर काय फायदा आहे, असा आरोप राज यांनी केला.
कोर्टाने आता कठोर राहायलं हवं, कोर्टाने आदेश दिल्यानंतरही सरकार कारवाई का करीत नाही सगळ्यात आधी सरकारवर कारवाई केली पाहिजे, देशाची सिस्टीममध्येच दोष आहे, वरपासून खालीपर्यंत सगळेच दोषी आहेत. कोण कुठला अबू आझमी इथे येऊन दोन मतदारसंघातून निवडून येतो, कोण निवडून देतं यांना यांचीच लोक निवडून देतात ना? अस सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
- कृपाशंकर यांचा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक आहे
- कृपाशंकर यांची संपूर्ण कलिना मध्ये जमिन आहे.
- हे असे बाहेरून येणारे आमच्या महाराष्ट्रात घोटाळे करतात आणि आपण त्यांना निवडून देतो
- अनेकांना सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहचवणारे कृपा हे दलाल आहेत
- २००९ पासून ह्या गोष्टी सुरू आहेत आणि कारवाई करण्यासाठी तीन वर्ष का लागले आहे
- कृपाशंकर सिंह यांच्यासारखे दलाल इथल्याच नेत्यांनी पोसले आहेत
- कृपाशंकर सगळ्यात मोठे दलाल
- कृपाशंकर आत गेले की, अनेकांचे नंबर लागणार आहेत
- कृपाशंकर यांच्यावर कारवाईला काँग्रेस दिरंगाई का करीत आहे
- जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येत आहे
- तोंडदेखली कारवाई होत असेल तर काय फायदा आहे
- सगळ्यांचे हितसंबंध असल्याने बहुतेक जण अडकणार आहे
- महाराष्ट्रातलं राजकारण ह्यांनी गढूळ केलं आहे
- कोर्टाने आता कठोर राहायलं हवं
- कोर्टाने आदेश दिल्यानंतरही सरकार कारवाई का करीत नाही सगळ्यात आधी सरकारवर कारवाई केली पाहिजे
- देशाची सिस्टीममध्येच दोष आहे, वरपासून खालीपर्यंत सगळेच दोषी आहे
- आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत जाण्यासाठी कृपाशंकर सिंह यांची पाठराखण करतात
- कोण कुठला अबू आझमी इथे येऊन दोन मतदारसंघातून निवडून येतो, कोण निवडून देतो यांना यांचीच लोक
- विरोधकही तितकेच दोषी आहेत