www.24taas.com,झी मीडिया, नागपूर
पोपट पाळणार असाल तर सावधान. कारण आता पोपट पाळणाऱ्यांना २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. लवकरच याबाबत वनविभागाकडून आदेश काढण्यात येणार आहेत.
सूचीबद्ध प्राणी आणि पक्ष्यांना घरात पाळण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घेणं गरजेचं असतं. मात्र पोपट पाळण्यासाठी वनविभागानं परवनागी दिलेली नाही. पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून त्याला मुक्त संचाराचा हक्क आहे. त्याचं आयुष्य पिंज-यात बंद करणं हा गुन्हा आहे.
केवळ हौसेखातर पोपट पाळणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. यातून मोठ्या प्रमाणावर पोपटांची तस्करी होते. त्यामुळे पोपटांचा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्यांना आता लगाम लावण्याचे वनविभागाने ठरवलं असून वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.