www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
पतीनं टाकून दिल्यानंतरही जीद्दीनं उभ्या रहाणाऱ्या... अनाथांची सेवा करणाऱ्या... सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा समावेश असलेला धडा यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलाय. इंग्रजीच्या पाठ्यापुस्तकातून आता विद्यार्थ्यांना सिंधूताईंचा खडतर प्रवास अनुभवता येणार आहे.
सिंधुताई सपकाळ... शिक्षण अवघं चौथीपर्यंत... स्वतःच्या नशिबी अनाथ होण्याची पाळी आलेली या माऊलीनं मात्र हजारो अनाथांचं पालकत्व स्वीकारलं. गोसेवेपासून सिंधुताईंनी सुरू केलेलं सामाजिक काम आता वटवृक्षाप्रमाणं मोठं झालंय. आज २७२ हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. अशा या सिंधूताईंच्या जीवनकार्याची दखल आता पाठ्यपुस्तक महामंडळानंही घेतलीय. यंदापासून दहाविच्या अभ्यासक्रमात इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांना सिंधुताईंचा संघर्षात्मक प्रवास अभ्यासाला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही हा अनोखा अनुभव असणार आहे.
ताईंच्या गोतावळ्यातील काही जण डॉक्टर झाले. काही जण वकील झाले तर काही जण त्यांच्याच जीवन कार्यावर पीएचडी करत आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला आलेला हा नवा धडा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.