राज वादाचे पडसाद नाशिक महापौरांना भोवणार

मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com,नाशिक
मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.
उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी काढलेल्या या पत्रकात सभागृहाचं मत विचारात न घेता महापौर निर्णय घेत असल्याचं म्हटलंय. याची अनेक उदाहरणंच उपमहापौरांनी दिली आहेत. वर्षभराच्या कारभाराचा राज ठाकरेंनी लेखोजोखा घ्यावा अशी मागणीही या पत्रकात करण्यात आलीये. भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनीही राज यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी यक्त केलीये.

आधी चर्चा करायची अन् संध्याकाळी सेटिंग करायचं ही विरोधीची पक्षनेत्यांची पद्धत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले होते.. एकनाथ खडसे मनसे मदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. त्यावरून भाजप नेते एकनाथ खडसे दुखावले गेले.
मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणला होता. या वादवरून मनसे आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय.