www.24tass.com , झी मीडिया, नाशिक
दुष्काळामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत सापडलेल्या कांद्याचे भाव वधारलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याचा दर क्विंटलला ३२०६रूपये झाला. आवक मंदावल्यानं ही दरवाढ झालीये. याचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला. मुंबई ठाण्य़ात किरकोळ बाजारात कांदा ४२ ते ४५रूपये किलोने विकला जात होता.
राज्य सरकारच्या स्वस्त धान्य विक्री केंद्रावरही कांद्याचा भाव ४० रूपये इतका होता. यंदाच्या हंगामात उन्हाळी कांद्याने गाठलेला हा सर्वाधीक भाव आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी हवामानामुळे मालही खराब होत असल्याने नविन कांदा बाजारात येण्यास अद्याप १५ ते २०दिवसांचा अवधी लागण्याची शक्याता आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी सर्वसामान्यांना कांदा रडवणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.