शिवसेनेत लाचारी, अजित पवारांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीये. साहेबांना निवडणुकीला उभं राहण्याचं आवाहन देण्यापेक्षा स्वतः उभं राहून दाखवावं, असं ते म्हणालेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 08:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीये. साहेबांना निवडणुकीला उभं राहण्याचं आवाहन देण्यापेक्षा स्वतः उभं राहून दाखवावं, असं ते म्हणालेत.
मनोहर जोशींनी बाळासाहेब ठाकरेंना साथ दिली आणि त्यांचीच नाचक्की केल्याची टीकाही पवारांनी केली. चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरेंना वाकून नमस्कार केल्याचा दाखला देऊन शिवसेनेत लाचारी असल्याचा टोमणाही अजितदादांनी लगावला.
पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजितदादांची जीभ पुन्हा सैल सुटली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.