www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला अखएरच्या टेस्टमध्ये आऊट केलं ते नरसिंह देवनं. त्यानं सचिनला 74 रन्सवर आऊट केलं. क्रिकेच्या देवाला देवनारायणला आऊट करण्यात यश मिळालं. सचिन तेंडुलकर मुंबई टेस्टमध्ये 74 रन्सवर आऊट झाला. त्याची सेंच्युरी अवघी 26 रन्सनं हुकली. 200 व्या टेस्टमध्ये त्याची सेंच्युरी पुर्ण न झाल्यानं त्याचे चाहतेही नाराज झाले. सचिन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर त्याचे चाहतेही निराश होऊन वानखेडेच्या बाहेर पडले.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ७४ रन्सची खेळी केली. सचिन सेंच्युरी करेल असं वाटत असतानाच मास्टर ब्लास्टर आऊट झाला. सचिन आऊट झाल्यानंतर त्याचे चाहते अतिशय भावनाविवश झाले. सचिनची ही शेवटची टेस्ट असल्यामुळे आता यापुढे आपला देव दिसणार नाही... या जाणिवेनं त्याचे चाहते भावूक झालेत.
200 व्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात सचिनला ७४ धावांवर समाधान मानावं लागलं असलं तरीही भारतीय फॅन्स मात्र समाधानी नाहीत. सचिन आऊट झाल्यावर स्टेडीयममध्ये डाव घोषित करण्यासाठी चाहत्यांनी महेंद्रसिंग धोणीकडे धोषा धरला होता. इनिंग घोषित केल्यास पुन्हा सचिनला दुस-या इनिंगमध्ये फलंदाजी मिळेल आणि शतक झळकावण्याची संधी मिळेल अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. अगदी अशाच मागण्या सोशल नेटवर्कींग साईट्सवरही नोंदवल्या जात होत्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ