www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
छोट्या पडद्यावरील चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन-७ मधून अभिनेत्री काम्या पंजाबी शनिवारी बाहेर पडलीय. काम्यानं बिग बॉसच्या घरात तब्बल १३ आठवडे व्यतीत केलेत. या कालावधीत आपण कोणत्याही प्रकारच्या राजनीतिचा भाग नव्हते, त्यामुळेच मी आनंद आहे, असं काम्यानं म्हटलंय.
छोट्या पडद्यावर नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या ३४ वर्षीय काम्या ही यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमधली दमदार स्पर्धक मानलं जात होतं. नव्हे, विजेत्यांमध्येही तिच्या नावाची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती. काम्यानं घरातून बाहेर पडल्यानंतर ‘मला घरातून बाहेर पडल्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. जेव्हा मला नॉमिनेट केलं गेलं तेव्हाच मी या कार्यक्रमातून बाहेर पडण्यासाठी तयार झाले होते. गेल्या अनेक आठवड्यांपासून मला घरी जाण्याची ओढ लागली होती’ असंही काम्यानं म्हटलंय.
‘बिग बॉक्स’ या अनोख्या टास्कमध्ये काम्यानं एका छोट्याशा बॉक्सखाली ४० तासांपेक्षाही जास्त वेळ बंद राहून एक अनोका रेकॉर्ड केला होता. तिची या शो दरम्यान टिकून राहण्याची जिद्दही यानिमित्तानं दिसली होती. काम्यानं घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर एक नातं तयार केलं होतं. पण ती जास्त जवळ होती ती काही आठवड्यांपूर्वी या घरातून बाहेर पडलेल्या प्रत्युषा बॅनर्जीसोबत... त्यानंतर तीची गौहर खानशीही चांगली गट्टी जमली होती.
नुकत्याच झालेल्या आपल्या घटस्फोटाच्या कारणावरून काम्या अनेकदा गंभीर दिसली होती. पण, घरातल्या सगळ्या स्पर्धकांसाठी चविष्ठ जेवण बनवणं काम्याचं आवडतं काम होतं.
आता, बिग बॉसच्या घरात गौहर खान, कुशाल टंडन, तनिषा मुखर्जी, अरमान कोहली, संग्राम सिंग, व्ही जे अँन्डी आणि एजाझ खान हे स्पर्धक उरलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.