गेलने आयपीएलमध्ये पूर्ण केली षटकारांची डबल सेंच्युरी

 एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएल ८ च्या आठव्या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध खेळताना रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने आयपीएलमधील आपला २०० सिक्सर लगावला. 

Updated: Apr 14, 2015, 05:26 PM IST
गेलने आयपीएलमध्ये पूर्ण केली षटकारांची डबल सेंच्युरी title=

बंगुळरू :  एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएल ८ च्या आठव्या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध खेळताना रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने आयपीएलमधील आपला २०० सिक्सर लगावला. 

टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगळुरूच्या संघाकडून गेलने मॅचच्या तिसऱ्या चेंडूवर सिक्सर लगावला. 

गेलने सुरूवात तर चांगली केली पण १६ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने २१ धावा बनून प्रविण कुमारच्या चेंडूवर आशीष रेड्डीच्या हाती कॅच देऊन आऊट झाला. 

गेलने हा कारनामा आयपीएलच्या ७० सामन्यात केला आहे. आयपीएलमध्ये षटकार लगावणाऱ्यांमध्ये गेल खूप पुढे आहे. सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने ११७ सामान्यातील ११३ डावांमध्ये १३४ षटकार लगावले आहे. तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा, चौथ्यावर युसूफ पठाण आणि महेंद्र सिंग धोनी पाचव्या स्थानावर आहे. 

रोहितने १३०, पठाण ११६ आणि धोनीने ११५ षटकार लगावले आहेत. यंदाच्या सिझनमध्ये गेल आठ षटकार लगावून दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नईकडून खेळणार मॅकलम नौ षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.