रवी शास्त्रीवर गांगुलीनंतर गंभीर बरसला

टीम इंडियाच्या कोचच्या निवडीवरून सुरु झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Updated: Jun 30, 2016, 04:47 PM IST
रवी शास्त्रीवर गांगुलीनंतर गंभीर बरसला title=

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या कोचच्या निवडीवरून सुरु झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. सौरव गांगुलीनं रवी शास्त्रीवर टीका केल्यानंतर आता भारताचा ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीरनंही शास्त्रीला लक्ष्य केलं आहे. 

ज्या प्रमाणे रवी शास्त्री माध्यमांमध्ये येऊन प्रतिक्रिया देत आहे, हे बघितल्यावर त्याची अगतिकता आणि निराशा दिसत आहे. रवी शास्त्रीला कोच होता आलं नाही हे त्याला मान्य होत नाहीये, माझ्या मते अनिल कुंबळेच हा भारतीय टीमसाठी सर्वोत्तम कोच आहे, असं गंभीर म्हणाला आहे. 

 

मागच्या अठरा महिन्यांच्या यशाचा दाखला रवी शास्त्री देत आहे, पण तो टीमबरोबर असताना टीमला अपयशही आलं आहे. बांग्लादेशविरुद्धची वनडे सीरिज भारत हारला, घरच्याच मैदानामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही भारताचा पराभव झाला. टी 20 वर्ल्ड कप भारतामध्ये असूनही भारताला सेमी फायनलपर्यंतच मजल मारता आली, अशी टीका गंभीरनं केली आहे. 

मी टीमबरोबर असताना भारत टी 20 आणि टेस्टमध्ये नंबर एक झाला असं शास्त्री म्हणत आहे, पण मागच्या 18 महिन्यांमध्ये भारतानं काय कमावलं. भारताबाहेर टीमला एकही मालिका जिंकता आली नाही, असे प्रश्नही गंभीरन उपस्थित केले आहेत.