कोलकाता : भारत-पाकिस्तान क्रिकेट वॉर अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे, या वर्षाच्या डिसेंबरमध्ये भारत-पाकमध्ये ३ कसोटी, ५ वन डे आणि २ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान आणि बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या चर्चेत निर्णय याबाबत निर्णय झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत यूएईमध्ये होणाऱ्या या मालिकेत ३ कसोटी, ५ वन डे आणि ५ ट्वेण्टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जावी असा प्रस्ताव आहे. सामन्यांचं वेळापत्रक मात्र अजून निश्चित झालेलं नाही. तसंच सरकारची परवानगी मिळाल्यावरच या मालिकेचं आयोजन करता येईल, असं दालमिया यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी रविवारी कोलकात्यात बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यावर एकमत झाल्याचं खान यांनी जाहीर केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.