अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास!

अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

Updated: Dec 13, 2014, 12:45 PM IST
अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास! title=

अॅडलेड : अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

या अगोदर, कॅप्टन पदावर असताना पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला होता. सध्या, सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्याच टेस्टमध्ये विराटनं दोन्ही वेळेस मिळालेल्या दोन्हीही संधीचं सोनं केलंय. आजच्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या भागात खेळताना कोहलीनं पुन्हा एक शतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा कोहली पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय.

कोहलीच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधली ही टेस्ट मॅच ३० वी टेस्ट मॅच ठरलीय. १४१ रन्स ठोकून कोहली तंबूत परतला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.