मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये सा-यांच्या नजरा खिळणार आहेत त्या विराट कोहली आणि ख्रिस गेलवर...वानखेडेवर विराट कोहली धमाका करतो की ख्रिस गेलचं वादळ घोंघावचं याचीच उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागलीय.
आज विराट कोहली विरुद्ध ख्रिस गेल असाच सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडेवर रन्सची बरसात कोण करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. कोहली पुन्हा धमाका करणार की ख्रिस गेलचं वादळ घोंघावणार, हे संध्याकाळी ७ वाजल्यानंतर समजणार आहे.
मुंबईतील वानखेडेवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये जरी सेमी फायनलची रंगत रंगणार असली तरी खरी लढत रंगणार आहे ती विराट कोहली आणि ख्रिस गेलमध्ये. कारण हे दोन्हीही प्लेअर्स मॅच विनर आहेत. दोन्हींपैकी कोणाच्या बॅट्समनधून वानखेडेवर रन्सची बरसात होते याकडेच तमाम क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलय. ख्रिस गेलचा जलवा इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये आपल्याला पहायला मिळालाय. त्यानं इंग्लंडविरुद्ध विस्फोटक इनिंग खेळत या वर्ल्ड कपमधील पहिला सेंच्युरी झळकावली. गेलनं ४८ बॉल्समध्ये ही धडाकेबाज सेंच्युरी केली. विशेष म्हणजे गेलनं ही सेंच्युरी वानखेडे स्टेडियमवरच ठोकलीय.
तर विराट कोहलीनं पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हाफ सेंच्युरी ठोकलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५१ बॉल्समधील तडाखेबंद नॉट आऊट ८२ रन्सच्या निर्णायक इनिंगनं तर विराटनं सा-यांची मन जिंकली आहेत.
विराट कोहलीनं चार मॅचेसमध्ये आतापर्यंत १८४ रन्स केल्या आहेत. त्यानं ९२च्या सरासरीनं या रन्स केल्या आहेत. नॉट आऊट ८२ रन्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. कोहलीनं आतापर्यंत दोन हाफ सेंच्युरी झळाकवल्या आहेत.तर ख्रिस गेलनं चार लढतींमध्ये १०४ रन्स केल्या आहेत. त्यानं १०४च्या सरासरीनं या रन्स केल्या आहेत. नॉट आऊट १०० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. गेलच्या नावे एक सेंच्युरी आहे.
सेमी फायनलमध्ये विराट कोहली विंडिजविरुद्ध कोहली रन्स करु शकणार नाही....आणि कोहली खेळला तरी चालेल मात्र टीम इंडिया पराभूत झाली पाहिजे असं गेल मजेत म्हणालाय. आता गेलची ही मजा कोहली किती गंभीरपणे घेतो आणि मोहालीसारखा धमाका वानखेडेवर करतो का हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. गेलला वानखेडेवर तुफानी खेळी खेळण्याचा अनुभव आहे. यामुळे गेल पुन्हा वानखेडेवर आपला दांडपट्टा चावलण्यासाठी आतूर असेल. आता वानखेडेवरील या शोमध्ये विराट कोहली शो स्टॉपर ठरतो की ख्रिस गेल याचीच उत्सुकता तमाम क्रिकेट फॅन्सला लागून राहिलीय.