मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

Intern Intern | Updated: Apr 1, 2017, 06:18 PM IST
मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज title=

मुंबई : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

ती तर मालिका भारताने जिंकली मात्र आता सर्वांचं लक्ष आयपीएलकडे लागलं आहे. आपली निवड झालेल्या आयपीएलच्या टीममधून आपली गच्छंती होऊ नये, म्हणून अनेक ऑसी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी 'मांडवली' करायला सुरुवात केली आहे.

सर्वात आधी स्टीव स्मिथनं अजिंक्य रहाणेला 'बियर' ऑफर केली. मात्र अजिंक्यनं ती नाकारली. आता मिचेल स्टार्कनं विराटला अशी विनंती केलीये. मात्र तो खरा विराट कोहली नसून खोट्या विराटला.

तर झालं असं की त्याने विराटला ट्विटरला मेसेज केला. पण हे विराटचं ऑफीशिअल अकाऊंट नव्हतं. त्याच्या हा मेसेज विराटच्या एका फॅनला गेला. त्या पठ्ठ्यानेही तो मेसेज सोशल मिडीयाच व्हायरल केला.

माध्यमांमध्ये चालू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना घाबरून स्टार्कने तसा मेसेज केला होता. पहा तो काय म्हणतोय या ट्विटमध्ये.