सिडनी : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने निवृत्ती घेतल्याने, याची उणीव भरुन काढणे कठीण जाईल, असं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मायकेल क्लार्कने म्हटलंय.
'भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीपेक्षा कठीण जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये क्वचितच एखादी असेल. या जबाबदारींतर्गत येणारा दबाव, अपेक्षा, परीक्षण आणि प्रचंड प्रेम यांना धोनीपेक्षा क्वचितच इतर कोणी अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळले असेल.
खेळाच्या तीनही प्रकारांत खेळताना धोनी याने एकाच वेळी कर्णधारपद व यष्टिरक्षणाची जबाबदारी कशी सांभाळली असेल, ही बाब माझ्या आकलनापलीकडची आहे. त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे; त्याची उणीव भरुन काढणे खरोखरच अत्यंत अवघड आहे,असं क्लार्कने म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.