'मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय'- राज कुंद्रा

आयपीएलप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर राज कुंद्रानं स्पष्टीकरण दिलंय. आपण निर्दोष असून मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय, असं राज कुंद्राचं म्हणणं आहे.  

Updated: Jul 15, 2015, 12:29 PM IST
'मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय'- राज कुंद्रा title=

मुंबई: आयपीएलप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर राज कुंद्रानं स्पष्टीकरण दिलंय. आपण निर्दोष असून मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय, असं राज कुंद्राचं म्हणणं आहे.  

राज कुंद्राचं स्पष्टीकरण पाहा -

"दुःखद आणि निराशाजनक दिवस कारण माझ्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मी या प्रकरणी तपासात केलेलं सहकार्य मलाच भोवलं, असं मला वाटतं. पहिल्या दिवसापासून मी नेहमीच मुदगल समितीच्या चौकशीत मदत आणि सहकार्य केलं. मात्र हे माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. कारण कोणताही पुरावा नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आलीय. तरीही मला दोषी धरण्यात आलंय. 

आजवर अंतिम अहवालाची प्रत मला मिळालेली नाही ज्यात अखेरची काही निरीक्षण नोंदवण्यात आलीत. दिल्ली पोलीस किंवा राजस्थान पोलिसांच्या तपासातल्या कोणत्याही बाबी कारवाईसाठी धरल्या जातील अशा नव्हत्या. मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय असं मला वाटतं, असं असलं तरी सुप्रीम कोर्ट आणि देशातल्या न्यायसंस्थांबाबत पूर्ण आदर आहे. मला वाटत नाही की मी काहीही चुकीचं केलंय".

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.