आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात झाला रेकॉर्ड

आयपीएलच्या नवव्या हंगामातील मुंबई इंडियन्स वि रायजिंग पुणे सुपरजायंट या पहिल्याच सामन्यात एक नवा रेकॉर्ड झाला. 

Updated: Apr 10, 2016, 04:49 PM IST
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात झाला रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलच्या नवव्या हंगामातील मुंबई इंडियन्स वि रायजिंग पुणे सुपरजायंट या पहिल्याच सामन्यात एक नवा रेकॉर्ड झाला. 

पुण्याच्या या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र या सामन्यात असे घडले जे आयपीएलच्या इतिहासात आजवर घडले नव्हते. पुण्याच्या चार गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूत विकेट मिळवत नवा रेकॉर्ड केला. 

इशांत शर्माने ओव्हरमधील पहिल्याच चेंडूत रोहित शर्माला पायचित केले. त्यानंतर त्याने लेंडल सिमेन्सला बाद केले. त्यानंतर मिशेल मार्शने पाचवी ओव्हर खेळताना पहिल्याच चेंडूत हार्दिक पंड्याला बाद केले. तसेच रजत भाटियाने आठव्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूत किरेन पोलार्डला बाद केले. 

स्पिनर आर.अश्विनने अंबाती रायडूला १६व्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूत अंबाती रायडूला बाद केले.