दोहा : दोहामध्ये एका 32 वर्षीय भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत स्थानिक सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
कतारची राजधानी दोहातील मदिनात खलिफा येथे काम करत असलेला प्रमोद थेराईल हा भारतीय तरूण लग्नाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामना खेळत होता. सामन्यादरम्यानच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो मुळचा केरळमधील मलापुरम जिल्ह्यातील वेलियांकोड गावचा रहिवासी आहे.
क्रिकेट सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या छातीत दुःखू लागले. त्यानंतर तो तेथेच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, पण रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.