कोलकता : आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे.
पाकिस्तान आणि इंग्लडचे खेळाडू या स्पर्धेत खेळत नाही. कोलकता नाइट रायडर्सच्या गोलंदाजी सल्लागार अक्रम याने म्हटले की, आयपीएलमुळे खेळाडूंना केवळ आर्थिक फायदाच नाही तर त्यांना आपले कौशल्याला धार लावण्याची संधी मिळते. ५० ते ६० हजार प्रक्षेकांसमोर क्रिकेट खेळल्यावर मनोबल वाढते.
आयपीएलमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना खूप शिकायला मिळते. मला आशा आहे भविष्यात पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळेल अशी आशा करतो असेही अक्रम यांनी सांगितले.
पाकिस्तान वर्ल्ड कपमधून लवकर बाहेर पडला. त्यानंतर बांगलादेश विरूद्धच्या वन डे सिरीजमध्ये ०-३ ने पराभव पत्करला. त्यानंतर टी-२० सामन्यातही पराभवाचा सामान करावा लागला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.