बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानी मीडियाने विराटची उडवली खिल्ली

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी आशिया कप सामन्यावेळी बांग्लादेशी चाहत्यांनी तयार केलेल्या एका फोटोवरुन वादंग उठला असतानाच आता पाकिस्तानी वृत्तवाहिनीने असाच खोडसाळपणा केलाय.

Updated: Mar 19, 2016, 07:40 PM IST
बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानी मीडियाने विराटची उडवली खिल्ली title=

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी आशिया कप सामन्यावेळी बांग्लादेशी चाहत्यांनी तयार केलेल्या एका फोटोवरुन वादंग उठला असतानाच आता पाकिस्तानी वृत्तवाहिनीने असाच खोडसाळपणा केलाय.

एक्सप्रेस टीव्ही असं या वृत्तवाहिनीचं नाव आहे. त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी एक पोस्टर तयार केलंय ज्यात त्यांनी विराट कोहलीची टिंगल केलीये. 

या पोस्टरवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान आपले दंड दाखवत आहे आणि विराट कोहली त्यावर लोंबकळत आहेत. पोस्टरवर लिहिलंय 'आम्हाला हरवू शकशील इतका तुझ्यात दम नाही'. तर विराट कोहली म्हणतोय 'आई आई, पाकिस्तानी टीम मोठे खेळाडू घेऊन आलीये.' 

क्रिकेट सामन्याआधी भारतीय खेळाडूंचे खच्चीकरण करण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक उपाय केले जात आहेत त्याचाच हा भाग म्हणायला हवा.