कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज

भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.

Updated: Jun 25, 2016, 05:50 PM IST
कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज  title=

मुंबई : भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत. एवढच नाही तर शास्त्रींनी सौरव गांगुलीबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोचच्या नियुक्तीसाठी सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांनी कोलकत्यामधून दहा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. माझ्या मुलाखतीवेळी सौरव गांगुली का उपस्थित नव्हता असा सवाल शास्त्रींनी विचारला आहे. 

मागचे अठरा महिने मी भारतीय संघाबरोबर होतो, तरीही माजी निवड न झाल्यानं मी नाराज असल्याचं शास्त्री म्हणाले आहेत. 

संध्याकाळी पाच ते सहाच्या वेळी मी बँकॉकमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून मुलाखत दिली, यावेळी लक्ष्मण आणि बीसीसीआयचे संयोजक अनिल जगदाळे बंगाल हॉटेलमध्ये होते, तर सचिन लंडनवरून स्काईपवर होता, असं शास्त्रींनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटलं आहे.

मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल(कॅब)च्या बैठकीला उपस्थित होतो, साडेसहा वाजता मी ही बैठक संपवून बाहेर आलो. त्यानंतर मी अनिल कुंबळे, प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांच्या मुलाखतीवेळी हजर होतो, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली होती.