'त्या' गोळीबाराची पोलीस चौकशी होणार

भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पर पडत होता त्यावेळी नेमक्या किती गोळ्या फायर केल्या गेल्या ते अजूनही अस्पष्ट आहे. 

Updated: Apr 18, 2016, 08:07 AM IST
'त्या' गोळीबाराची पोलीस चौकशी होणार title=

राजकोट : भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार झाल्याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पर पडत होता त्यावेळी नेमक्या किती गोळ्या फायर केल्या गेल्या ते अजूनही अस्पष्ट आहे. 

याप्रकरणी लोढीखा पोलिसांना चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. पोलिसांकडे अजूनही कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी चौकशीचा निर्णय घेतलाय. 

रविंद्र जाडेजा आणि रिवा यांच्या विवाहाचे विधी सुरु होते. त्यावेळी ही फायरिंग झाली. त्यामुळे जडेजाचा विवाह सोहळा चांगलाच वादात सापडण्याची शक्यता आहे.