रवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2017, 01:29 PM IST
रवींद्र जाडेजा आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी title=

मुंबई : भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं बॉलिंगमध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. 

भारताच्याच आर. अश्विनला मागे टाकत जाडेजा बॉलिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान झालाय. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये रवींद्र जाडेजानं चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा जाडेजाला फायदा झालाय. 

पहिल्या तीन टेस्टमध्ये आतापर्यंत जाडेजानं आपल्या फिरकी गोलंदाजीनं कांगारुंच्या २१ फलंदाजांना तंबूत धाडलं होतं. त्याच्या याच कामगिरीचा फायदा त्याला झाला आहे.